उस्माननगर, माणिक भिसे| गोपाळसुत एमेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील शहीद जवान हाणमंत काळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने समता विद्यालय व जि.प.के.प्रा.कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यांच्या हस्ते सदीच्छा पत्र लिहून व राखी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उस्माननगर येथील सामाजिक कार्यात नेहमी नागरिकांच्या मदतीला, सहकार्याला धावून येणारे प्रतिष्ठान म्हणून उस्माननगर पंचक्रोशीत ख्याती आहे. प्रतिष्ठाणचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य आणि नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते शिवशंकर काळे व कोमल काळे यांनी यावर्षी गोपाळसुत एमेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथे प्रथमच राखी उपक्रमाचे आयोजन केले होते.समता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व जि.प.के.प्रा कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशा हास्त अक्षरात सदीच्छा पत्र लिहून प्रतिष्ठान कडे दिले आहे.
दरवर्षी साजरा होणारा राखीपोर्णिमा सण हा देशाची सुरक्षा करणाऱ्या भारतीय पुत्र जवान यांना राखी व सदीच्छा पत्र पाठवून सण उत्साहात साजरा करण्याचे कोमल काळे यांनी आयोजित केलेल्या उपक्रमास मुलीनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
भारतीय जवानांना सण असो की अन्य कोणताही सण, उत्साव या सणांमध्ये सुट्टी मिळत नसते.ते अहोरात्र सीमेवर तटक्ष राहून आपली रक्षा करतात.ते तिथे डोळ्यांत तेल घालून आपणाला संरक्षण देतात.उस्माननगर येथील शिवशंकर काळे व कोमल काळे यांनी यावर्षी गोपाळसुत एमेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांसाठी सदीच्छा पत्र व राखी उपक्रम राबवून जवानांना हिम्मत यावी म्हणून बहीणी कडून राखी उपक्रमातून संदेश त्यांच्या कडे पाठविला आहे. या उपक्रमास शाळेतील मुख्याध्यापक, यांच्या सह शिक्षकांनी परिश्रम घेतले आहे.