उस्माननगर, माणिक भिसे| भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव तथा दीनदयाळ नागरी सहकारी बॅंक म.अंबाजोगाई बॅंकेच्या संचालिका सौ.पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दीनदयाळ बॅंक शाखा नांदेडच्या वतीने दि.२५,व२६ जुलै २०२२दोन दिवसीय अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामधे बॅंक महिला आर्थिक समावेशाच्या दृष्टिन महिलांना बॅंकींग प्रवाहात आनण्यासाठी झीरो बॅलेन्सवर महिलांचे बचत खाते उघडण्याचा उपक्रम संपन्न करण्यात आला. यामधे एटीएम व युपीआय सुविधेचा लाभ ग्राहकांना मिळणार असल्याचे शाखाधिकारी समीर बनवसकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला बॅंकेचे स्थानिक सल्लागार ॲड.विनायकराव नांदेडकर,वैजनाथ गुट्टे,आशिष कदम,रुपेश हलगे,हर्षद दुर्गै,अक्षय पंत, महिला ग्राहक मोठ्या संखेने उपस्थित होते.