हिमायतनगर। कोरोना सारख्या महामारी मुळे गेली 2 वर्ष शाळेतील किलबिलाट बंद झाला होता. यावर्षी जून महिन्यात प्रतेक शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांना हर्ष झाला. याच आनंदाचे वाटेकरी होऊन अनेक सामाजिक संस्थेने जमेल तशी विद्यार्थ्यांना मदत करताना आपण पाहिले आहे. त्यापैकी सिरंजनी येथील सामाजिक संस्था आसणारी हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजणी ही 2012 पासून अनेक उपक्रम राबवित आहे. यावेळी या संस्थेच्या वतीने पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या बाल विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी भेट म्हणून " हिरण्यगर्भ बाल उजळणी" च्या आकर्षक प्रती वाटप करण्यात आल्या आहेत. या बाल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान ने केला आहे.
२०१२ मध्ये उदयास आलेल्या हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान या संस्थेने वेग वेगळे नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम घेण्यासाठी नावलौकिक प्राप्त केलेले आहे. शिक्षण क्षेत्रात घेण्यात येणार्या या उपक्रमात सिरंजणी सर्कल आणि संलग्न ग्रामीण भागात पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास ५०० "हिरण्यगर्भ बाल उजळणी" या पुस्तकाच्या आकर्षक प्रती प्रत्यक्ष पणे वाटप करण्यात आल्या आहेत.
या उजळणीत बाल विद्यार्थ्यांना आवडतील अशा सुरेख चित्रांसह, अंक, चौदाखडी, इंग्रजी लिपी याचा समावेश आहे. तसेच बालकांवर उत्तम संस्कार व्हावेत या हेतूने मनाचे श्लोक, सुविचार, बालगीते, चांगल्या सवयी आणि आपल्या दैवतांची ओळख अशा अनेक गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठानची ही छोटीशी भेट बाल विद्यार्थ्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे. यावेळी शैक्षणिक जीवनात चिमुकले पाय ठेवणाऱ्या बाल विद्यार्थ्यांना हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे खुप खुप शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. शरिराला श्रमाकडे, बुध्दी ला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळवणारे साधन म्हणजे शिक्षण या म्हणी प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात स्वतःला झोकून देऊन यशाचं सर्वोच्च शिखर काबीज करावं. अस मत हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजणीचे सदस्य तथा सिरंजनी चे विद्यमान सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी व्यक्त केले.
आत्तापर्यंत सिरंजनी सर्कल मधील कोठा, कोठा तांडा, बोरगडी तांडा 1 व 2, बोरगडी, धानोरा, मंगरूळ, वारंग टाकली शेलोडा व सिरंजनी ह्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना उजळणी मिळाली असून लवकरच सर्कल मधील सर्व गावांना उजळणी पोहचेल असे नियोजन आहे.