अर्धापुर| तालुका तलाठी संघाची बैठक दि.6 जुलै रोजी श्री.पी.व्ही.खंडागळे निमंत्रक,नांदेड जिल्हा तलाठी संघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.त्यामध्ये श्री.आर.एस.सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी मध्ये कार्यध्यक्ष पदी श्री.रमेश गिरी,उपाध्यक्षपदी श्रीमती प्रीती भुरेवार ,सचिव पदी श्री.रवी पल्लेवाड ,कोषाध्यक्षपदी श्रीमती उज्वला वानखेडे संघटक म्हणून एम.के.पाटील,सल्लागार म्हणून .नविनरेड्डी,मुल्ला शफीयोद्दीन ,बालाजी माटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकी मध्ये श्री.पी.व्ही.खंडागळे यांची निमंत्रक म्हणून व एल.आर.देशमुख यांची कार्यध्यक्षपदी जिल्हा कार्यकारीणी वर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.