अति गरीब ६५३ माजीमंत्री, माजी आमदाराच्या निवृतीवेतनात तिस कोटिची तरतुद? चंपतराव डाकोरे पाटिल
नांदेड। राज्यावर हजारो कोटि रुपये कर्ज असताना ? राज्याचा विकासासाठी साठ हजार कोटि रूपयाचे कर्ज घेतले जात असुन राज्यात अति गरीब माजीमंत्री, आमदार यांच्या निवृतीवेतनाच्या तिस कोटि पेशंन विधैकाला मंजुरी देऊन अतिगरिब माजीमंत्री, माजी आमदाराला आधार दिल्याबदल धन्यवाद
या राज्यातील दिव्यांगाना, निराधाराना आधार कोनाचा व ते कोणतेहि काम करू शकत नाहि अशाना दरमहा एक हजार मिळनारे अनुदान चार ते पाच महिने दिला जात नाहि,व त्या अनुदानात दोन वेळेचा चहा साठी दुध तरी मिळत नाहि?तेहि चालु असलेल्या लाभदारकाना दरवर्षी कुंटुबाचे एकविस हजाराचे ऊत्पन्नाचे,ह्यात प्रमाणपत्र, ईत्यादी देणे गरजेचे आहे अतिश्रीमंत,दिव्यांग,वृध्द,निराधाराना आहे.
पण या राज्यात अति गरिब त्यांना कोणतेहि ऊत्पन्नाचे साधन नाहि त्यांना आधार नाहि. अशा माजीमंत्री,माजी आमदार यांना कोणत्याहि अटिची गरज नाहि व त्यांना वेळेवर तारखेलाच पगार नाहि दिले तर ते भुकमारीने त्यांना त्रास होऊ नये म्हणुन आमच्या शासनाने काळजी घेऊन राज्यातील ६५३ माजीमंत्री,माजी आमदाराना मदत केल्याबदल या मंत्रीमंडळाचे जाहिर आभार आम्हि गोरगरिब दिव्यांग,वृध्द, निराधार, शेतमजुर,गायरानपट्टेधारक,शेतमजुर,शेतकरी मतदार बांधवानी लोक प्रतिनिधी यांना मते देऊन सतेत पाठविले आपल्या चार पिढयाची व्यवस्था व्हावी म्हणुन आपणास मते दिल्याची संतप्त मत दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी व्यक्त केली.