उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर ता.कंधार येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेचा तेरावा वर्धापनदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी, शाखाधिकारी, कर्मचारी, व ग्राहकांच्या उपस्थितीत बुधवारी २० जुलै रोजी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र ग्रामीण बँक उस्माननगर शाखेत रंगीबेरंगी फुगे, पुष्पहार, आकर्षक रांगोळी काढून व मिठाई वाटून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. शाखाधिकारी वैभव मसरे, भिमराव सोनकांबळे, रोखपाल श्रीकांत भूरेवाड, सेवक पांडुरंग टिमकेकर यांच्या सह गावासह परिसरातील बॅंकेच्या ग्राहकांची उपस्थिती होती. महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापनेपासून ते आजपर्यंत या शाखेत १५ हजार च्या वर ग्राहक असून आलेगाव, लाठखुर्द, तेलंगवाडी, भंडारकुमठ्याची वाडी, शिराढोण आदीं गावातील ग्राहकांचा समावेश आहे.
या बॅंकेच्या माध्यमातून शेतकरी, महीला बचतगट, नागरिकांना कर्ज मंजूर करून रोजगार मिळवून दिला.या शाखेला आसपास असलेल्या गावातील खातेदारांना कमी-अधिक प्रमाणात कर्ज देवून सहकार्य केले आहे.त्यामुळे खातेदारांची नाळ या बॅकेशी जूळली आहे.मागील १३ वर्षांपासून नागरिकांनी बॅकेशी प्रामाणिकपणा जपून ठेवी परत केलेली आहे.वर्धापनदिनी शाखाधिकारी यांनी शेतकरी व ग्राहक यांना कर्ज मंजूर करून वर्धापनदिन उत्साहात साजरा केला.ग्राहकांच्या वतीने यावेळी कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.