नांदेड| प्रज्ञा जागृती मिशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भानुदास परशुराम जी यादव यांच्या द्वितीय पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 28 जुलै 2022 रोजी "यदूकुल" यादव अहिर मंडळ, साथी बालाराम यादव नगर, हनुमान पेठ, वजीराबाद, नांदेड येथे मोफत करोना बूस्टर डोस लसीकरण शिबिर संपन्न झाले.
प्रज्ञा जागृती मिशन ,नांदेड वाघाळा महानगरपालिका, अखिल भारतीय यादव महासभा, लक्ष्मण प्रतिष्ठान,यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण अधिकारी डॉ बालाप्रसाद कुंटूरकर आणि त्यांच्या संपूर्ण समूहाच्या वैधकीय मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अखिल भारतीय यादव महासभेचे राष्ट्रीय महासचिव बिशनकुमार यादव गवळी समाजाचे नेते नामदेव गायकवाड, प्रसिद्ध वकील संजय भाऊ जामकर प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक धीरज यादव, प्रज्ञा जगृती मिशन चे सचिव गगन यादव, किशोर यादव, भारत यादव, गोकुल यादव, अमोल शरद चौधरी, लक्ष्मण प्रतिष्ठानचे राधाकिशन यादव सुशांत रौतरे यादवेश को-ऑपरेटिव सोसायटीच्या सौ रेणुका कैलाश यादव, अनिता राधाकिशन यादव, सुनिता गणेशलाल यादव,सुमन भानुदास यादव, सौ.मीना सुभाष बटावले, सौ पुष्पा गणेशलाल, चौधरी गणेशलाल परशुराम मंडले, तसेच मोठ्या प्रमाणावर परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ कैलाश भानुदास यादव यांनी केले. दोन वर्षापूर्वी स्वर्गीय भानुदास परशुराम यादव यांचे करणाच्या आजारामुळे निधन झाले होते सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या यादव यांचे पुण्यस्मरण करतांना ओबीसी समाजाचे नेते नामदेव आयलवाड यादव महासभेचे बिशनकुमार यादव, माजी नगर सेवक किशोर यादव, नगरसेवक धीरज यादव, गगन यादव आदींनी भानुदासजी यांच्या सोबत केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमाच्या आठवणींना उजाळा दिला. दोन मिनिटाचे मौन बाळगून भानुदास यादव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गोपाळ फ़तेलष्करी, सुशांत यादव, शिव काळे , शुभम यादव, विनोद सातव ईश्वर रौत्रे,भावेश यादव, काव्या यादव आदींनी परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रमाचे समारोप गोकुल यादव यांनी केले.