नांदेड। स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वांना परवडेल अशी अतिदक्षता रुग्ण सेवा देण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी खा. ह्रदयरोग तज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या उद्घाटन प्रसंगी रविवार दि. 12 जून 2022 रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. श्यामराव वाकोडे , मन्ना महाराज कोलंबीकर च्यासह रुग्णालयाचे डॉ.दिनेश धुत, डॉ. पांडुरंग इबितवार,डॉ. आशा विभूतवार, डॉ.गाडेकर, व्यवस्थापक डॉ. संगमेश्वर, धम्पलवार सावकार यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर चालणाऱ्या हॉस्पिटलच्या रुग्णसेवेची प्रशंसा करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या धर्तीवर एक खाजगी परवडेल अशा अतिदक्षता वैद्यकीय सेवा देत असल्याचे प्रतिपादन केले. हे रुग्णालय भविष्यामध्ये आदर्शवत ठरणारे खाजगी रूग्णालय असून सर्वांना समान वैद्यकीय सेवा मिळणे हा देशातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार असल्याने ती शासनाची जबाबदारी असल्याचे माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी सांगितले. यावेळी स्वामी विवेकानंद हॉस्पिटलच्या रुग्णसेवेबद्दलचे मत प्राध्यापक वाघमारे, पांडे व मन्ना महाराज कोलंबीकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी रामानंद स्वामी विवेकानंद हॉस्पिटल चे संचालक डॉ. दिनेश धूुत, किसन पाटील गडगेकर, डॉ. शहाजी जाधव, डॉ.राम मुसंडे, डॉ. पांडुरंग इबितवार व्यवस्थापक संगमेश्वर व झंपलवाड सावकार यांच्यासह हॉस्पीटलच्या स्टाफने परिश्रम घेतले.