नविन नांदेड। बारावीच्या परीक्षेत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अश्राम शाळा वाघाळा चा निकाल कला शाखेच्या ९४ टक्के तर विज्ञान शाखेच्या ९६ टक्के लागला असुन यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाचालक तथा प्राचार्य भगवानराव इंगेवाड यांनी केले आहे.
उच्च माध्यमिक बोर्ड लातुरचा वतीने घेण्यात आलेल्या मार्च २२ चा परिक्षेत महात्मा फुले उच्च माध्यमिक अश्राम शाळा वाघाळा यांच्या कला शाखेच्या निकाल ८४.५९ लागला असुन प्रथम कुं हानमंते मयुरी ७०/ टक्के व्दितीय,तर कुं राठोड शितल ६९.८३ गुण घेऊन तृतीय राठोड बालाजी ६९.३३ घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे,तर विज्ञान शाखेत कुं.शेटकार रेणुका ८६ टक्के घेऊन प्रथम,कुं पाटील अंबिका ८३ टक्के व्दितीय,बडे ओकांर ८३ टक्के घेऊन तृतीय आली आहे. विशेष प्राविण्य व यश संपादन करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाचालक व प्राचार्य भगवानराव इंगेवाड,सचिव सुहास इंगेवाड व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.