नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या सिंचन विहिरीचे आज मौजे अतकूर येथे धर्माबाद तालुक्याचे गट विकास अधिकारी राजेंद्रप्रसाद बजाज यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे यांनी जिल्ह्यातील सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार धर्माबाद तालुक्यातील या आर्थिक वर्षातील सर्व लाभार्थ्यांना विहिरीचे मार्कआउट देण्यात आले. तालुक्यातील अतकूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहीरीचे लाभार्थी विलास प्रकाश वाघमारे यांना यंदा या योजनेचा शासनाच्या वतीने लाभ देण्यात आला. अवघ्या दिड महिन्यात त्यांनी जिद्दीने विहीरीचे खोदकाम तसेच बांधकाम पुर्ण करुन विहीर पुर्ण करुन जिल्ह्यात लाभार्थ्यांसमोर सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या विहीरीचे जलपूजन गट विकास अधिकारी राजेंद्रप्रसाद बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, कृषी अधिकारी (विहियो) गंगासागर चिद्रावार आदी यावेळी उपस्थित होते. गील आर्थिक वर्षातही तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने विविध योजनांचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. विधीमंडळाच्या पंचायतराज समितीच्या भेटीदौऱ्यात तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीं नाभेट देण्यात होती, त्यावेळी कृषी विभागाच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विभागाचा सत्कार करण्यात आला होता.
जिल्हा परिषद उपकर अंतर्गत कडबा कटर, बायोगॅस सयंत्र योजनेची पाहणी गट विकास अधिकारी यांनी केली, याबाबत करण्यात आल्याने कृषी विभागाचे अभिनंदन गटविकास अधिकारी बजाज यांनी केले आहे. जिल्ह्यातील पहिल्या सिंचन विहिरीचे भूमिपूजन कार्यक्रमास माजी विस्तार अधिकारी आर.एम. चोंडे, संग्राम केंद्रे, विकास दारमोड, राष्ट्रपाल सोनकांबळे आदी उपस्थित होते.