किनवट। किनवट तालुक्यात व शहरात मागील एका महिण्यापासुन मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आक्रमक भुमिका घेतली असुन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांना एका निवेदन सादर करुन किनवट शहर व तालुक्यातील मोबाईल व इंटरनेट तत्काळ सुरळीत करण्यात यावी अन्यथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर तिव्र जनआंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
मिरगाच्या पावसाने दांडी मारल्याने या पुर्वीच चिंतेत असलेल्या शेतक-यांच्या समस्यामध्ये मोबाईल नेटवर्कने वाढ केली आहे. तर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत, तर एकमेंकांचा संपर्क होत नसल्याने नागरीकांचा वेळ वाया जात आहे तर अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत.
या विरुध्द राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आक्रमक भुमिका घेतली असुन आज सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मोबाईल नेटवर्क सुरळीत करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन करु असा इशारा ही दिला आहे. तर निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, सचिव कचरु जोशी, अंबाडी तांडाचे माजी सरपंच कैलास राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत तर त्यांची उपस्थिती देखिल होती.