‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ यावर २३ जून रोजी चर्चा -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये गुरुवार दि. २३ जून रोजी ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२०) या विषयावर एक दिवसीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, संकुलाचे संचालक व अधिकारी  सहभाग घेणार आहेत. 

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ ची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन सूचना पारित झाल्या आहेत. त्यानुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग, ए.आय.सी.टी.ई., महाराष्ट्र शासन यांनी देखील प्रत्यक्ष अंमलबजावणी साठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उच्च शिक्षण संदर्भात विचार मंथन करण्यासाठी गुरुवार दि. २३जून रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

सदर सहविचार सभेसाठी शिक्षणप्रेमी तथा शिक्षण धोरणामध्ये काही सूचना देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहून ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’च्या प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भात आपले अभ्यासपूर्ण विचार मांडावेत. त्याच प्रमाणे आपले विचार अथवा सूचना लेखी स्वरूपात apds.srtmun@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. तसेच एक प्रत सोबत आणावी असे आवाहन शैक्षणिक नियोजन व विकास विभागाच्या सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार यांनी केले आहे. सदर सहविचार सभेतील सहविचार मंथनाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी