नांदेड। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सोमवार 13 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड व इतर जिल्ह्यातील उमेदवांरानी याचा लाभ घ्यावा, असे औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुभाष परघणे यांनी केले आहे.
या मेळाव्यात विविध आस्थापनांचा सहभाग असणार आहे. त्यांची शिकाऊ उमेदवारांची मागणी त्यांचे कंपनीच्या नावासमोर दर्शविण्यात आलेली आहे. बजाज ॲटो औरंगाबाद 50 उमेदवार, ब्रीज स्टोन पुणे-100 उमेदवार, महिद्रा ॲन्ड महिद्रा 500 उमेदवार, इन्डयुरन्स औरंगाबाद 100 उमेदवार, बडवे इंजिनिअरींग 50 उमेदवार, इतर कंपनी 400 उमेदवार वरीलप्रमाणे एकूण अंदाजित 1 हजार उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयटीआय मधील विविध व्यवसायातील उमेदवार उदा. विजतंत्री, तारतंत्री, मोटार मेकॅनिक डिझेल मेकॅनिक, वेल्डर, फीटर व इतर सर्व व्यवसायातील उमेदवार सुध्दा या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात. शिकाऊ उमेदवारी साठी 11 हजार रुपये ते 20 हजार रुपयापर्यत विद्यावेतन मिळणार आहे. काही कंपन्यामध्ये विद्यावेतनासह बस व कॅन्टीन सुविधा अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच ठराविक कंपन्यामध्ये 70 टक्के मुलींसाठी संधी असणार आहे. या संधीचा शिकाऊ उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.