किनवट| राज्यात भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकीत ५ पैकी ५ जागा जिंकल्या या विजयाचा जल्लोष किनवट भाजपा तर्फे जिजामाता चौकात फटाके वाजवुन, विजयी घोषणा देऊन व पेढे वाटुन साजरा करण्यात आला.
राज्यातील नागरीकांच्या मनात असलेले स्थान भाजपा नेतृत्वाने कायम राखले आहे, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या विजयाने आपले नेतृत्व सिध्द केले आहे. तरी राज्यातील राजकिय घडामोडीत चर्चेत राहण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनिती यशस्वी करण्यात त्यांना यश आल्याने भाजपा मध्ये नवचैतन्य संचारले आहे.
किनवट भाजपा तर्फे माननीय आमदार भीमरावजी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आलेल्या जल्लोषाच्या वेळी भाजपा नेते अनिल तिरमनवार,माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानिवार, तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, किसान मोर्चाचे वेंकटराव इटकेपेलिवार, युवा मोर्चाचे उमाकांत क-हाळे, शिवा क्यातमवार, बाळकृष्ण कदम, सतिश बिराजदार, शैलेश गटलेवार, काकडे पाटील,जयराज वर्मा,मनोहर ताटे, सुनील मच्छेवार संतोष सिरमनवार, संतोष म्हरस्कोले,स्वागत आयनेनिवार, लक्ष्मीकांत मुंडे, विनोद पवार, वैभव सिरमनवार,आकाश भंडारे,गजानन शिवणकर,नंदू दराडे,प्रल्हाद, सुरेश साकपेल्लीवार, बालाजी न्यालमवार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिका-यांची उपस्थिती होती.