हिमायतनगरात सहा महिन्यात बीएसएनएलचा भोंगळ कारभार; ग्राहक वैतागले -NNL

बीएसएनएलच्या नेट्वर्क अभावी ग्राहक इतर कंपन्यांकडे वळू लागले


हिमायतनगर|
शहर व तालुका परिसरात गेल्या सहा महिन्यापासून बीएसएनएल कंपनीच्या नेट्वर्कमुळे सर्वसामान्य ग्राहक वैतागले आहेत. सुरळीत सेवा मिळत नसल्याने ग्राहक अन्य कंपनीकडे वळण्याच्या मार्गावर आहेत.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे दूरसंचार विभागाची दूरध्वनी आणि मोबाईल सेवा आहे. सध्या इंटरनेटच युग आल्याने ग्राहक वर्ग अल्प दारात सवलत मिळत असल्याने बीएसएनएलशी जोडल्या गेले आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यापासून बीएसएनएल विभागाचा भोंगळ कारभार सुरु असल्याने ग्राहक वैतागले आहेत. नेटवर्किंग सुरळीत मिळत नसल्याने आणि संपर्कांमध्ये बाधा नियमन होत असल्याने बाजारात विविध खाजगी कंपन्यांकडे दूरसंचार विभागाचे ग्राहक वळू लागले आहे. खरे पाहता शासनाच्या bsnl ची सेवा सर्वात स्वस्त आणि फायदेशीर असताना देखील संबंधित अधिकारी सुरळीत सेवा देण्यासाठी चालढकल करत आहेत, त्यामुळे खाजगी कंपण्यासोबत हातमिळवणी करून bsnl चे ग्राहक इतर कंपण्याकडे वळविण्यासाठी bsnl चे वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर तर करत नाहीत ना...? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

याबाबत अनेकदा वर्तमान पात्रातून आवाज उठविण्यात आला असताना देखील दुरसंचार विभागाच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामूळ की काय हिमायतनगरातील ग्राहक वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे येथील बेरोजगार युवक काशिनाथ गड्डमवार या युवकास बीएसएनएलचे टेंडर घेतले. आणि अत्यंत परिश्रमाने नेटवर्किंगचे जाळे हिमायतनगर शहरात पसरवीत ग्राहक वर्ग तयार केला आहे. मात्र त्यातही बीएसएनएलच्या नेटवर्किंग व रेंजच्या अडथळ्यामुळे ग्राहक वर्गाच्या मानस्थपाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे ग्राहक वारंगात बीएसएनएलच्या नेटवर्किंग सुविधेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब लक्षात घेता बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिमायतनगरातील दूरध्वनी आणि नेटवर्किंग सेवा सुरळीत मिळावी यासाठी लक्ष देण्याची मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.

याबाबत सुशिक्षित बेरोजगार युवक काशिनाथ गड्डमवार यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मी आत्तापर्यंत बरीच वेळा बीएसएनएलच्या वरिष्ठांशी संपर्क केला. मात्र सेवा सुरळीत होण्यात व्यत्यय येत आहे. या अडथळ्यामुळे मागल्या काळात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सर्वे करून पाहणी केली होती. तरीदेखील बीएसएनएलच्या वरिष्ठानी यात कोणतीही सुधारणा केली नसल्याने याचा फटका ग्राहकावर आणि माझ्या व्यवसायावरही बसत असल्याचे सांगितले.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी