व्यापारी मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव निमित्ताने रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड। व्यापारी मित्र मंडळ नवीन मोंढा नांदेड आयोजित शिवजन्मोत्सव निमित्त भव्य  रक्तदान शिबिरीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन महाप्रसाद व भजनास शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 शिवजन्मोत्सव निमित्ताने  १९ फेब्रुवारी २०२२ रोजी व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने नविन मोंढा मार्केट कमिटी समोर नांदेड येथे भव्य रक्तदान शिबीर व महाप्रसाद व प्रियंका मुनगिर पोत्रा व अंकीता भारती सौराती आलेगाव यांच्या भजनी मंडळाच्या आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आ .ओमप्रकाश पोकर्णा,  सभापती संभाजी पाटील पुयड, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर,भुंजग पाटील डक,दता पाटील पांगीरकर, सदाशिवराव देशमुख तरोडेकर, व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरात १२५  रकतदातयानी रक्त दान केले. रक्तदान करणा-या सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. रकतसंकलन जिवन आधार रक्तपेढी चा वतीने संकलन करण्यात आले.

शिवजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद पाटील काकांडीकर, शिवाजी पाटील वासरीकर, बालाजी पाटील भायेगावकर, प्रल्हाद पाटील इंगोले,संतोष मुळे पाटील आसेगावकर,बद्रीनारायण मंत्री, विजयकुमार पोकर्णा, प्रवीण शेठ कासलीवाल, सदाशिवराव देशमुख, नवनाथराव दर्यापूरकर, विठ्ठल देशमुख, मुन्ना उराडे, दत्ता पाटील मुळे,गणेश पाटील वासरीकर, गंगाधर पावडे, सुनिल देशमुख कासारखेडेकर, घनश्याम शेठ खटोड, विजयकुमार गोयंका, दीपक शिंदे, नेरलीकर पाटील, रामनिवास मुरक्या,राजेंद्र जिंके, सखाराम तुपेकर, राजू पालदेवार, महेश मुंदडा, बंडू पाटील रेडगावकर, शंकरराव पत्रे ,सुनील देशमुख सुभाष ढोकीकर ,भगवान डाखोरे, गंगाधर असर्जनकर व सर्व व्यापारी मित्र मंडळ नवीन मोंढा नांदेड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी