नांदेड| येथील विनायकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी सरदार अमरप्रीतसिंघ जज यांची तर सचिवपदी सतीश कळणे आणि कोषाध्यक्षपदी प्रा.ललिता कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील विनायक मजूर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सरकटे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अमरप्रीतसिंघ जज, सचिवपदासाठी सतीश कळणे आणि कोषाध्यक्ष पदासाठी प्रा.ललिता कुंभार या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तत्पूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संचालक म्हणून सतीश कळणे, अमरप्रीतसिंघ जज, देविदास कदम, बालाजी कदम, भगवान पवळे, ऍड.प्रदीप नागापूरकर, श्रीमती निता जोशी, श्रीमती विमल ऐकाळे, सौ.ललिता कुंभार, सरुबाई धमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया तालुका उपनिबंधक शुभांगी गौड यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.के.सरकटे यांनी काम पाहिले.