अर्धापूरात मंगळवारी बुलढाणा अर्बन बँकेकडून अर्धापूर नगरपंचायतचे सर्व पक्षीय नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे शाखाधिकारी रामचंद्र बोंढारे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसव्वीर खतीब, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, भाऊरावचे संचालक प्रवीण देशमुख, जिल्हा सचिव निळकंठराव मदने,जेष्ठ नगरसेवक सोनाजी सरोदे,सलीम कुरेशी,शेख जाकेर, प्रल्हाद माटे, बाबूराव लंगडे,व्यंकटी राऊत,गाजी काजी,डॉ.विशाल लंगडे,मुख्तेदरखान पठाण यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व पक्षीय नगरसेवक व प्रतिनिधींचा शाल,हार,व प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे म्हणाले कि,संस्था व सामाजिक संघटनांनी शहराच्या विकासासाठी समोर यावे,आपण विकासकामांसाठी समन्वय घडवून आणू असे ते म्हणाले.शेटे, देशमुख,खतीब यांनी सत्काराला उत्तर दिले.अध्यक्षीय भाषणात बोलतांना बोंढारे म्हणाले कि,हा सत्कार संस्थापक राधेश्यामजी चांडक यांच्या आदेशानुसार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन बँकेच्या सहा राज्यांतील 465 शाखांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात असून, या बॅंकेचे १७५००करोडचा उलाढाल झाली असल्याने मोठ्या प्रमाणावर सभासदांचा विश्र्वास मिळविल्याने बॅंकेला सामाजिक कामात प्रोत्साहन मिळते,असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निळकंठ मदने यांनी तर आभार सतीन देशपांडे यांनी मानले. याप्रसंगी शहाबाज खान पठाण,अझर काझी, गौसमुल्ला, वसंत राऊत,सुनिल मोरे,संदीप कदम,राहुल माटे,बालाजी मैड,चद्रकांत पत्रे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.