हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव पंचायत समितीचे तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे पार पडला.
या कार्यक्रमाला हदगाव तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर, युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर हदगाव पंचायत समितीच्या सभापती महादाबाई तमलवाड, जि.प. सदस्य विजय बास्टेवाड, उपसभापती शंकर मेंडके, डॉ. भगवान निळे, शेषराव पाटील वाळकीकर, आनंदराव पाटील, तामस्याचे सरपंच बालाजी महाजन, अशोक कोडगीरवार, अमोल आडे, अरविंद कंटाळे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी किशन फोले,जि. प. सदस्य अरुण सरोदे, प्रभाकर कासेवाड, गंगाधर मोपलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे दिप प्रज्ज्वलन आमदार माधवराव पाटील जळगावकर, कृष्णा पाटील आष्टीकर, महादाबाई तमलवाड, शंकर मेंडके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हदगांव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. फोले साहेब यांनी केले. यावेळी कोळी केंद्रातील श्री. उत्तमराव पुंजाजी चव्हाण, श्रीमती जटाळे अश्विनी त्र्यंबकराव,श्री. बिराजदार दत्तात्रय शंकर,श्री.स्वामी रामेश्वर रुद्रप्पा,श्री पाटील डी. एम. श्री. सुरशेटवार सर, श्री. टेकाळे डी. एम. यांना हदगाव तालुकास्तरीय गुरुगौरव पुरस्कार आ माधवराव पाटील जवळगावकर व युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या हास्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की समाज घडविणारे चालते बोलते व्यासपीठ म्हणजे शिक्षक होते . ग्रामीण भागातील मोठ्या केंद्रावर गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा जेणे करुन ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होईल. युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर बोलताना म्हणाले राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षकच करतात.
शिक्षकाना मतदार नोंदणी, पल्स पोलिओ, कोरोना लस अशी बरीच कामे करावी लागतात. त्या कामाचे ही त्यांनी कौतुक केले. या कार्क्रमाचे सूत्र संचलन चंद्रकांत मेकाले व ज्योती कीर्तनकर यांनी केले. आभार प्रदर्शन गुणवंत काळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तामसा हायस्कुलचे मुख्याध्यापक ए. आर. बस्तेवाड, रमेश भालेराव , संजय कांबळे, शैला माळभागे, रेखा मोरलवार यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.