अधिका-याचे लोकेशन घेण्यासाठी नेमले युवक.... हदगाव तालुक्यात झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण रेतीच्या धंद्यात -NNL


हदगाव, शे चांदपाशा|
रेतीचा धंदा म्हणजे सोन्याचे अंडी देणारा... आहे.. त्यामुळे अवैध रेतीचे मँनेजमेट जमले की झटपट श्रीमंत होता येते. अश्या लालसेपोटी हदगांव तालुक्यातील अनेक जण तर काही गुप्त पतद्धतीने आपल्या नेत्याचा राजकीय वापर करतांना दिसुन येत आहेत. दुसरी गंभीर बाब अशी की, या अवैध व्यवसाय मध्ये युवकांचा सहभागासह व्यसनाधीनतेचे प्रमाण ही वाढत असल्याचे स्पष्ट जाणवत असुन, हदगाव तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालय हदगाव यांनी अवैध वाळुच्या तस्करी बाबतीत सक्त धोरण अवलंबूल्या मुळे हे दिसुन येत आहे.

या बाबतीत उपविभागीय कार्यालय कडुन मिळालेल्या माहीती नुसार उपविभागीय आधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार जीवराज डापकर यांनी नेमलेले पथक व उपविभागीय कार्यालयाचे पथक प्रमुख बी बी. हबर्ड यांच्या पथकाने आता पर्यत १६ अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहने पकडुन त्यांच्यावर दडात्मक कारवाई केल्या. यामधुन शासनास १३७३५२५ (तेरा लक्ष ञ्याहत्तर हजार पाचशे पंचवीस रुपये) इतका महसुल मिळवून दिला. या कामी हदगांव तहसिल कार्यालयाचे तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकात शिवकुमार जयस्वाल (अव्वल कारकुन) विशाल शेवाळकर नागेश कोकरे  तसेच तहसिल कार्यांयालायची पण महत्त्वाची कामगीरी या कामी दिसुन आली.

'प्रशासन अचानक सक्रिय.. या बाबतीत अधिक माहीती घेतली असता महसुल प्रशासन माञ या दोन महीण्यातच अवैध रेतीच्या बाबतीत माञ अचानक सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे. ही बाब चांगली जारी आसली तरी दुसरी गंभीर्याने पाहव लागत आहे की, या प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने संबधित अधिका-याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी काही युवकांची नेमणूक या रेती तस्कारानी केली असल्याची चर्चाही ऐकवायास मिळत आहे. त्यापोटी त्यांना चांगली रक्कम ही दिली जाते आहे.

निसर्गाच्या कृपने हदगाव तालुक्यात रेतीचे मोठमोठे साठे आहेत. यातुन प्रशासनाला लाखो रु महसुल  राँयल्टीच्या स्वरुपात मिळत असतो. या रेती घाटाना काहीनी आपले टार्गेट केले आहे. कमी श्रमात जास्त पैसा मिळतो म्हणुन काही युवक विविध राजकीय नेत्याचे समर्थक असल्याचा देखावा पण करतांना दिसुन येतात. तर काही गुंडवृतीचे तरुण ही कमी श्रमात जास्त पैसा कामविता येत असल्याने गुंडगीरीची भाषा ही करतांना दिसुन येतात. यामुळे तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडुन कारवाई केल्या जात आहे दंड ही लाखो रुपायात आहे. पण रेती माफीया कारवाईची भिती नसल्याचे दिसुन येत आहे. रेती उत्खनन हे अंधारात होत असले तरी सर्वसामान्यना माञ रेती सोन्याच्या भावात खरेदी करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे आवर्जून उल्लेख करावा लागेल. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी