प्रभाग क्र.१अ,व ५अ, साठी अनुसूचित जाती महिला राखीव तर प्रभाग क्र.७अ व ११अ साठी अनुसूचित जमाती महिला राखीव
धर्माबाद। नगरपरिषदेचा कार्यकाळ संपून सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. ओबीसी आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले असल्याने या निवडणुका लांबणीवर गेलेल्या होत्या परंतु न्यायालयाने निवडणूक विभागास आदेश देत निवडणूक प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्यानंतर येथील नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत दि.१३ जून रोजी सोमवारी सकाळी ११:०० वाजता नगरपालिका मैदानात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र शेळके तर नगर पालिका मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सन २०११ मध्ये झालेल्या जनगणने नुसार निश्चित केलेल्या लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना करण्यात आली असून पुर्वी ९ प्रभागाचे आता ११ प्रभाग करण्यात आले.महिलासाठी ५०% आरक्षण राखीव ठेवण्यात आले.धर्माबाद ११ प्रभागातील २२ जागांचे आरक्षण जाहीर झाले.प्रभाग क्रमांक १अ) अनुसूचित जाती महिला,(ब) सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक २अ)
सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक 3अ) सर्वसाधारण महिला (ब)सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक ४अ) अनुसूचित जाती (ब) सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्र. ५अ) अनुसूचित जाती महिला,(ब) सर्वसाधारण प्रभाग क्र. ६अ) सर्वसाधारण महिला,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र.७अ) अनुसूचित जमाती महिला,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र. ८अ) सर्वसाधारण महिला,(ब) सर्वसाधारण प्रभाग क्र. ९अ) अनुसूचित जाती महिला, (ब)सर्वसाधारण ,प्रभाग क्र.१०अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण , प्रभाग क्र.११अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण साठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.