नांदेड| कु.अंजली विलास जोंधळे या विद्यार्थीनीने दहावी परिक्षेत 94 टक्के गुण घेवून जानापुरे कोचिंग क्लासेस व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीच्या या यशाबद्दल क्लासेसचे संचालक बाळासाहेब मुनेश्वर यांनी तीचे अभिनंदन केले आहे.
इयत्ता 10 वी परिक्षेत विष्णूनगर येथे असलेल्या जानापुरे कोचिंग क्लासेसने आपली 100 टक्के यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. यंदाही सर्वच्या सर्व 30 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यात सर्वप्रथम असलेली कु.अंजली विलास जोंधळे 94 टकके, कु.अपुर्णा लिंबगावकर 92.88 टकके, सिद्धार्थ कमलाकर 92.60 टक्के, प्रिती सरोदे 84.60 टक्के, पुनम पांचाळ 84 टक्के, स्वाती खानसोळे 82.50 टक्के, प्रशिक रायबोळे 80 टक्के, जयश्री पवार 78 टक्के, शेजल लोंढे 78.20 टक्के, प्रगती चौदंते 78.40 टक्के, सम्राट भुजबळ 76 टक्के, अदित्य यादव 74.40 टक्के, गणेश चव्हाण 74.40 टक्के, साक्षी शेवटे 73 टक्के, अंजली पाटील 70.30 टक्के, अनिकेत राऊत 73.80 टक्के, श्रावणी धुपलवार 73.50 टक्के, तनुश्री गवळी 73 टक्के इ. विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना जानापुरे कोचिंग क्लासेसचे संचालक बाळासाहेब मुनेश्वर, शिक्षक स्वाती लबडेपाटील, किशन पाटील, मुदीराज मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.