महात्मा बसवेश्वरांची 891 वी जयंती उत्साहात जय शिवाच्या जय घोषात मुदखेड शहर दुमदुमले
मुदखेड। शहरात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने समता नायक, क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री अपरंपार स्वामी मठ संस्थान च्या मैदानावर आयोजित जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते. राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शंकरअण्णा पत्रे, खाजगी प्रतिष्ठानचे नंदूअप्पा देवणे, भक्तीस्थळचे शिवप्रसाद कोरे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण नरडेले, तालुका प्रमुख प्रकाश कांचनगीरे, डॉ संदीप पचलिंग, प्रवीण गायकवाड, संजय कोलते, ईश्वर पिन्नलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे, जिल्हाप्रमुख दिगंबर मांजरमकर, मुख्य संघटक शिवाजी कहाळेकर यांच्या हस्ते शोभा यात्रेचे पूजन करण्यात आले. मठ संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेटे, प्रथम नगराध्यक्ष राम चौधरी व पूर्व गटनेते माधव कदम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना मठ संस्थानच्या विकासासाठी सर्व पक्षीय सहकार्य करण्याचे आश्वासित केले.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना प्रा. मनोहर धोंडे म्हणाले, बाराव्या शतकात शिव दीक्षेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही निर्माण करणारा भारत हा पहिला देश असून महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण मानव जात एक करण्याचा प्रयत्न केला. अनुभव मंडप या धर्म संसदेत विविध जातीचे 700 शरण व 70 शरणी यांचा समावेश करून समता प्रस्थापित केली. शिवा संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसह देशभरात शासकीय जयंती साजरी केली जात असून भारत, रशिया, इंग्लंड यांसह अनेक देशात सुद्धा महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची मूल्य रुजविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. गौतम बुद्ध, बसवेश्वर महाराज, जोतिबा फुले, राष्ट्रपिता गांधी या क्रांतिकारी महापुरुषांना महात्मा या पदवीने गौरविण्यात आले.
याप्रसंगी गुरुवर्य डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, आचार्य गुरूराज स्वामी अहमदपूरकर यांचे आशिर्वचन झाले. प्रास्ताविक शहरप्रमुख सचिन चंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवा कर्मचारी महासंघाचे तालुका प्रमुख शिवकुमार देशमुख यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे प्रमुख इंजि. जयराज राजवाडीकर, गजानन शेटे, गोविंद गुडमवार, बाळू चुंचे, प्रल्हाद गोरगे, गणेश महाराज, बाळू चंद्रे, पंकज पचलिंग, राम कुलूपवार, श्याम चंद्रे, प्रसिद्धीप्रमुख अनिल अंबरखाने, मन्मथ राजेवार, अनिल पा. शेटे, आनंदा गुंजकर, सदाशिव तांडे, उज्ज्वला राजेवार, शुभांगी चुंचे, संगीता बादलवाड आदींनी परिश्रम घेतले.