नांदेड। ‘ओबीसी जागर सप्ताह 2022’ मंगळवार 24 ते 30 मे दरम्यान नांदेड जिल्हयात राबवण्यात यणार असल्याची माहिती संयोजक अॅड. प्रशांत कोकणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीन राजषी शाहू महाराज यांच्या पुतळयापासून दि. 24 रोजी दुपारी 03.00 वाजता डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयात अभिवादन करुन ओबीसी जागार सप्ताहाची सुरुवात होणार आहे.
ओबीसी समाजाचे नेते नागनाथ घिसेवाड, जाकेर चाऊस, के.पी. सोणे, दसरथ लोहबंदे, बाबुराव केंद्रे, भगवानराव हक्के, प्रा. संजय बालाघाटे, प्रा. डॉ. जि.आर. कारीकंटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सप्ताहाची सुरुवात होणार आहे. ओबीसी जागार सप्ताह नांदेड, मुदखेड, भोकर, तामसा, हदगाव, माहूर, किनवट, हिमायतनगर, उमरी, धर्माबाद, बिलोली, नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा या गावांमध्ये ओबीसी जागर सप्ताह साजरा होणार आहे.
या ओबीसी जागर सप्ताहात अदिवासी मन्नेरवारलू समाजाचे नेते सोपाणराव मारकवाड, दत्तात्रय अन्नमवाड, राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत कोकणे, बंजारा क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष विकास राठोड, आरक्षण हक्क संवर्धन समितीचे राज्य संघटक श्याम निलंगेकर, भिम पँथरचे मराठवाडा अध्यक्ष विनोद वाघमारे, धनगर समाजाचे नेते चंद्रकांत रोडे वंचितचे एकनाथ बन्सलवाड, यशवंत थोरात, कोळी महासंघाचे भारत गव्हाणकर यांचा समावेश राहणार आहे.
ओबीसी जागर सप्ताहाचा समारोप 30 मे रोजी दुपारी 2.00 वाजता माळेगाव यात्रा लोहा येथे होणार आहे. या समारोप कार्यक्रमास माजी खासदार हरिभाऊ राठोड, मंबई राजपत्रित अधिकार कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष भारतकुमार तांबिले, आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या संयोजिका मा. लता बंडगर या उपस्थित राहणार आहेत. ओबीसी जागर अभियानात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्याम निलंगेकर, अॅड. प्रशांत कोकणे यांनी केले आहे.