नांदेड। उन्हाची तीव्रता आणि सुट्ट्यांचा मोसम त्यामुळे संघरातील महानगरपालिकेच्या कै शांताराम सगणे जळतरणिका सध्या हाऊसफुल्ल आहे. सात बॅचमध्ये पोहू इच्छिणाऱ्याची मोठी गर्दी झाली आहे. या जलतरणिकेतील सर्व कर्मचारी पोहण्यास व नवशिकाऊ उमेदवारास सहकार्य करीत आहेत सौजन्यपूर्ण वागणूक आणि मार्गदर्शन त्यामुळे प्रवेश इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना काळात मागील दोन वर्षा पासून जळतरणीका बंद होती.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि पुन्हा जलतरनिका सुरू झाली.सकाळी सहा वाजल्या पासून वेगवेगळ्या बॅच आहेत. पाऊण तासाची एक बॅच असा दिवसभरात सकाळ-, सायंकाळ या दोन विभागात या बॅच आहेत. जीव रक्षक तैनात आहेत शिवाय प्रशिक्षक येथे येणाऱ्या नवं शिकाऊ उमेदवारांना पोहण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सांगतात. मनपा आयुक्त श्री लहान यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा कोरोनातील बंद काळा नंतर जलतरणीका हाऊस फुल्ल झाली आहे.
स्टेडियम प्रमुख रमेश चवरे याचा नियंत्रणात लाईफ गार्ड राजेश सोनकांबळे, यादव डुबुकवाड, तुकाराम निलेवाड, प्रकाश गोवंदे, मधुकर केंद्रे, कोच टुटूजा ऋषी, शेख रब्बानी, गजानन ठाकूर, ओमसिंग ठाकूर, भगत किसन यादव, माधव गच्चे यासह कर्मचारी आपआपली ड्युटी चोखपणे बजावत आहेत. यंदा स्विमिंग साठी मोठी गर्दी झाली आहे वार्षिक नोंदणी व दरमहा फिस भरणा केल्या नंतरच पावती पाहून पोहण्यासाठी आत सोडले जाते.
पण पोहण्यापूर्वी आंघोळी साठी शावरला मुबलक प्रमाणात पाणी नसते त्याची सुविधा करणे आवश्यक आहे . खेड्यातही बारव, विहिरीत डबडब पाणी राहिले नाही .नद्या तर कोरड्या पडली आता कॅनॉल ला कोणी पोहत नाही असा पोहण्याच्या दुष्काळी परिस्थितीत नांदेडची जलतरणिका पोहणाऱ्यासाठी वरदान ठरले आहे.बालगोपाल वृद्धनागरिक हे पोहण्याचा आनंद घेत आहेत.