सरकारमध्ये उद्योगपती तुपाशी आणि शेतकरी उपाशी सदाभाऊ खोताचा तमलुर मध्ये घणाघात -NNL


देगलुर/नांदेड।
जागर शेतकर्‍यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियान घेवुन राज्यभर निघालेल्या शेतकरी नेते माजी कृषिमंञी आ.सदाभाऊ खोत यांची शनीवारी राञी 7 वाजता तमलुर येथे सभा झाली. यावेळी बोलताना सरकारवर टिका करताना ऊद्योगपती तुपाशी आणी शेतकरी ऊपाशी असल्याचा घणाघात केला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,शिवकुमार देवाडे,शिवराज हांडे यांची व्यासपिठावर ऊपस्थिती होती. सरकारमध्ये का हा न्याय झाला तर गळफास लावून स्वतःवर अन्याय करण्याची ही रीतच होऊन जाईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले. 


बीड जिल्ह्यातील माझा तरणाबांड शेतकरी ऊसाचा फड पेटवतो आणि त्यामध्ये मधोमध लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करतो. हे महाराष्ट्रातील आजच भयानक वास्तव आहे. मी नुकतीच गेवराई तालुक्यातीलहिंगणगाव येथे जाऊन प्रत्यक्षात वास्तव अनुभवलं आणि काळजात चर्र झालं. नांदेड मधील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने ऊद्योगपती,खाजगी शिकवणी वाले,शहरातील व्यापारधंदे हे इतरञ जाण्यापुर्वी सरकारने यावर कडक कार्यवाही करुन भयमुक्त नांदेड करावे असे सांगीतले.


अजून किती आत्महत्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत. मी यापूर्वीच सभागृहात आग्रह धरला होता की तुम्ही फक्त शेतकऱ्याला आधार द्या त्याला अरे तुझा ऊस गेला नाही तर चिंता करु नको हे सरकार हेक्टरी एक लाख रुपये तुझ्या खात्यावर जमा करेल. एवढं सांगा म्हणजे निदान माझा ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करणार नाही.  हे मी ऑर्डूनी सांगत होतो. माझ्या शेतकरी भावांनो हे राज्यकर्ते पाषाण हृदयाचे आहेत. त्यांना पाझर फुटत नाही. म्हणून पक्षभेद विसरून शेतकरी प्रश्नावर आपण सगळ्यांनी जागरूक असायला हवं. निवडणुकीसाठी ज्याला  जायचं तिकडं जाऊ दया पण शेतकरी म्हणून आपण एकत्र येऊन लढुया. 

माझ्या सरकारच्या कार्यकाळात सर्वाधिक पुरपडी,पिकविमा,मागेल त्याला शेततळे हि योजना होती पण या महाविकास आघाडी सरकारमध्ये मागुन ही शेततळे शेतकर्‍यांना मिळत नसल्याची खंत माझ्यासमोर शेतकरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगीतले या सभेला शेतकरी बांधवाची ऊपस्थिती लक्षणीय होती परीसरातील हजारो शेतकरी सदाभाऊ यांना ऐकण्यासाठी आले होते.यावेळी रयत क्रांतीचे युवा प्रदेशाध्यक्ष पाडुरंग शिंदे मांजरमकर,जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,विनोद वंजारे,भाजपाचे शिवकुमार देवाडे,शिवराज हांडे,मुखेडचे तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील तारदडकर,नायगावचे साहेब चट्टे,ऊपस्थितीत होते.

नृसिंह जयंती निमित्त प्रसिध्द देवस्थान शेळगांवच्या नृसिंहला भेट
प्रसिध्द देवस्थान असलेल्या नृसिंह मंदीर शेळगाव येथे गुलालचा कार्यक्रम करुन भजनात तल्लीन झाले यावेळी भावीकांची मोठी गर्दी हौती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी