हदगाव, शे चांदपाशा। तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हदगाव शहराच्या शाखेत या पांच ञस्त शेतकऱ्यांनी वैतागून एका निवेदनद्वरे हरभरा खरेदी करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा तहसीलदार यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तालुक्यातील धोंडबराव कदम (फळी) चांदराव जाधव,(वाटेगाव) संतोष सुर्यवंशी (हडसनी ) गजानन कदम (फळी) सिताराम कदम (फळी) यांनी हरभरा रितसर आँनलाईन केले आहे परंतु या केद्रावर अत्यंत संथपणे हरभरा खरेदी करणे चालू आहे या मुळे फार उशीर होत परिणाम स्वरूप शेतक-या अनेक अर्थिक तसेच अनेक समस्यांचा सह अडचणीना तोंड दयाव लागत आहे.
या संदर्भात व आत्मदहनचा इशारा देणा-या शेतक-यानी अनेक वेळा अर्ज दिला. पण या बाबतीत संबंधित विभागाकडुन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्यामुळे येणाऱ्या खरिप हंगामाकरिता बी-बियाणे खरेदी करण्यासाठी अर्थिक अडचण निर्माण झालेली आहे.
त्यामुळे आमचा हरबरा दि २५ मे २०२२ पर्यंत खरेदी करुन घ्यावा व हरभरा खरेदीची पणन महासंघाने या बाबतीत हरभरा खरेदीची अंतिम दि२९ मे २०२२ आहे. त्यामुळे आमचा हरभरा तातडीने खरेदी करावा अन्यथा २७ मे २०२२ वैतागून आम्ही तहसिल कार्यालय समोर करण्याचा इशारा हे दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल आहे.