नरेंद्र - देवेंद्र महोत्सवात रंगली हास्याची मैफल, एका पेक्षा एक हास्य फवाऱ्यानी रसिक मंत्रमुग्ध -NNL


नांदेड।
येथे सुरू डॉ.सचिन उमरेकर व धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या  नरेंद्र - देवेंद्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी हास्य दरबार या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवींनी एकापेक्षा एक सादर केलेल्या हास्य कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेड च्या कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान नांदेड येथे सायंकाळी ठीक  साडेपाच वाजता रसिकांनी गर्दी केली होती. वेळेवर आलेल्या प्रेक्षकांमधून सोडतीद्वारे पाच रसिक श्रोत्यांना सविता अरुणकुमार काबरा यांच्यातर्फे कलर टीव्ही देण्यात आले. सुरुवातीला पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी,कै. सुधाकरराव डोईफोडे,कै. प्रकाश खेडकर,कै. संभाजीराव उमरेकर,कै. चंद्रभागा गंजेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अतिशय सुनियोजित असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांची उपस्थिती होती. अतिशय चांगल्या सजविलेल्या व्यासपीठावर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, व्यंकट मोकले, शिवराज पाटील होटाळकर, प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वागताध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर यांनी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांच्यासोबत भविष्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले . खासदार चिखलीकर व प्रविण साले यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाची तोंडभरून स्तुती केली. स्वागत समारंभाचे संचालन धीरज स्वामी यांनी केले. 

अतिशय रंगतदार झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात साईनाथ लिंगाडे आणि युगंधरा सांगवीकर यांनी गणेश वंदनेने केली. त्यानंतर विडंबनकार श्रीनिवास मस्के यांनी आपल्या हास्य कवितेने रसिकांना लोटपोट केले. हास्य कवि सिद्धार्थ खिल्लारे आणि सतीश कासेवाड यांनी रसिकांना आपल्या कवितेवर ठेका धरायला भाग पाडले. सातारा येथील कवी अनिल दीक्षित यांनी नोटाबंदी वरील कवितेने धमाल उडवून दिली. नांदेड येथील स्थानिक कवी शाहीर रमेश गिरी यांनी जुन्या काळातील महिला आणि आधुनिक महिला यांच्यातील तफावत त्यांनी घेतलेल्या उखाण्यातून महिला आणि हास्य रसिकांना विशेष भावणारी ठरली. भालचंद्र कोळपकर यांनी तर आपल्या हास्य कवितेतून जगण्याचा संदेश दिला. रसिक श्रोत्यांना हास्य चिंब करणार्‍या या हास्य दरबार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील सुप्रसिद्ध कवी बंडा जोशी यांनी केले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे रात्री दहा वाजता कार्यक्रम बंद करावा लागल्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी