चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही तर विकृती -NNL

राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका


मुंबई।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल अंत्यत हिन पातळीवर श्लोक पध्दतीने भाष्य करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हीने आपल्या फेसबुकवर प्रसारीत केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यै आक्रमक झाले असून आता या फेसबुकवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही केतकी चितळेला मानसिक विकृत असल्याचे सांगत राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका अशी विनंती करत इशारा दिला.

केतकी चितळे हिच्या पोस्टचा निषेध करणारे एक पत्रक मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारीत केले आहे. त्या पत्रकामध्ये ते म्हणाले की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीव जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणून गेली. खाली काही तरी भावे वैगेरे असं नावं टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले.


महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखा हलका विनोद वैगेरे समजू शकतो, त्यातली विनोद बुध्दीही ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि ते राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणे सांगणे गरजेचे आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी केतकी चितळेला दिला.

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतानी तसेच असंख्य बुध्दीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं ! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा ! असल्यातेही त्यांनी सांगितले.

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की, नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच चार-दोन विकत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होतं, वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होतं, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यत आली आहे, हे आता राज्यकर्त्यांना समजलं असेलच, हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचे आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून हा गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे पत्रकाद्वारे केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी