उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील मौजे पोखरभोसी येथे स्वराज्याचे रक्षक, प्रभूत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण,अशा अनेक क्षेत्रांत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी कैलास गिरी महाराज व माजी सरपंच व्यंकटी(भबरु)ताटे पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.यावेळी शिक्षक शिवाजी डांगे,छावा तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील ताटे, डॉक्टर साहेबराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कांबळे, मारोती ताटे, गजानन डांगे, व्यंकटी ताटे, बालाजी ताटे, जयराम डांगे, गोविंद डांगे, नारायण ताटे, सिताराम डांगे,नरबा ताटे, शिवाजी ताटे, गणेश डांगे,परसराम ताटे,आदि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.