नृसिंह जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन -NNL


नविन नांदेड।
नरोबा मंदिर देवस्थान जुना कौठा, नांदेड येथे ८ ते १५ मे दरम्यान नरसिंह जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते आज १५ मे रोजी हभप परमेश्वर कंधारकर यांच्ये काल्याचे किर्तन व  देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या कडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हारिनाम सप्ताह निमित्ताने  काकड आरती, अभिषेक, पारायण, गाथा भजन, हरिपाठ व  हरी कीर्तन होईल.सप्ताहा मध्ये  ह.भ.प. पंढरी महाराज मुरकुटे, मधुसूदन महाराज कापसीकर, शंकर महाराज लोढे,अशोक महाराज आळंदीकर,परमेश्वर गुरुजी कंधारकर,एकनाथ महाराज हरसदकर,कृष्णा महाराज पंढरपुर यांच्ये किर्तन झाले.

१५ मे रोजी नृसिंह जयंती निमित्ताने दुपारी १२  वाजता काल्याचे कीर्तनानंतर, महाप्रसादाचा  लाभ भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन नरोबा मंदिर अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे , मंदिर संस्थानचे पदाधिकारी व पुजारी व्यंकटेश गुरू,  यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी