राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बैठक संपन्न -NNL


नांदेड। 
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी बैठकीचा आढावा घेवून संबंधित विभागाला सूचना दिल्या.

याबाबत जिल्हातील सर्व शाळाकॉलेज शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात जनजागृती करावी. तसेच नागरिकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे व विक्री करण्यावर बंदी आहे.

अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला आरोग्यपोलिस विभागातील तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामीण डेंटल कॉलेजच्यावतीने नांदेड शहराच्या विविध ठिकाणी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देऊन जगजागृती करण्यात येणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी