प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 36 ई-बाइक्सची तपासणी -NNL

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम  


नांदेड।
 प्रादेशिक परिवहन कार्यालय वायुवेग पथकाने नांदेड शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या 36 ई-बाईक्सची तपासणी 23 व 24 मे रोजी केली. यावेळी वाहने दोषी आढळून आले असून त्यापैकी 4 वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ई-बाईक्स वाहनात अनधिकृत बदल करू नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम 26 व 27 मे 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. 

दोषी आढळल्यास संबंधित वाहन उत्पादकवाहन वितरक व वाहन धारकाविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येईल. तसेच ज्या वाहन वितरकांनी ई-बाईक्सच्या विक्रीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडकडून व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त केले नाही त्यांनी लवकरात-लवकर व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी