नव भारत युवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी लवकुश जाधव यांची निवड -NNL


नांदेड।
येथील युवा सामाजिक कार्यकर्ते लवकुश जाधव यांची नव भारत युवा संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश येथील नव भारत युवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भावनजी शर्मा यांनी ही निवड केली आहे.

हिमाचल प्रदेश येथील नव भारत युवा संघ ही संघटना अराजकीय असून ही संघटना राष्ट्रवाद आणि परंपरावादाच्या आदर्शांसह युवा सक्षमीकरणाचे काम करते. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नांदेड येथील युवा कार्यकर्ते लवकुश जाधव यांनी सामाजिक व युवा वर्गासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करुन नव भारत युवा संघाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे आवाहन केले आहे.

लवकुश जाधव यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच मिळाले असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मुकेश शबाना, अमरसिंग तिलावत, आशिष सकवान, लक्ष्मण फुलारी, कृष्णा जाधव, मनोहर राठोड, अंकुश जाधव, सुशीलकुमार चव्हाण, शैलेंद्र बेलेकर, मधुकर जाधव, विकास हिंगोले आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी