लोहा| इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जून महिन्यात लागणार आहे. निकालानंतर पुढील शिक्षणाच्या प्रवेशसाठी विविध शैक्षणिक कागदपत्रे प्रमाण पत्र दाखल्याची गरज असते . त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शालेय शिक्षणासाठी लागणारे विविध प्रमाणपत्र वेळेत काढून घ्यावेअसें आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात लागला आहे. त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विनाविलंब तत्काळ सेतु सुविधा केंद्रामार्फत विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज दाखल करावेत प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे असे तहसीलदार मुंडे यांनी सांगितले.
ऑनलाइन प्रमाणपत्र ज्या सर्व्हरद्वारे देण्यात येतात ते सर्व्हर युजर्सच्या संख्या जास्त असल्यामुळे हँग होणे असा तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. असा वेळी वेळेत प्रमाणपत्र मिळत नाहीत त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण येतेकार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र , जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र , भुमीहिन प्रमाणपत्र इत्यादी दाखले वितरित करण्यात येत असतात ते वेळेत काढून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार मुंडे यांनी केले आहे.