लोह्यात पतंजली योग परिवाराचे ११ दिवसीय योग शिबिर सुरू -NNL


लोहा|
"करा योग.. रहा निरोगी" असा संदेश देत निरोगी शरीरासाठी व्यायाम आवश्यक आहे. पतंजली परिवाराकडून शहरातील कै विश्वनाथराव नळगे विद्यालयाच्या प्रांगणात लोहा पतंजली योग परिवार यांच्या वतीने लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर दि. २६ मे ते दि. ५ जून या कालावधीत अकरा दिवशीय निःशुल्क योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सदरील शिबिरात उच्च रक्तदाब (ब्लडप्रेशर), मधुमेह (शुगर), वातरोग, थायरॉईड, मोटापा, मान-पाट आणि कंबरदुखी आदी रोगांवर मार्गदर्शन केले जाणार असून सदर शिबिरात अनिल अमृतवार (राज्य प्रभारी), सुरेश लंगडापुरे (जिल्हा प्रभारी), उर्मिला साजने, काळे व जिल्ह्यातील इतर प्रमुख मंडळींचे मार्गदर्शन होणार आहे. 

शिबिरास येतांना  शिबिरार्थ्यानी ( साधक) स्वतःचे चादर, सतरंजी आणावे पोशाख ढिले-ढाले (मोकळे) असावा, वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. महिलांनी शक्यतो सलवार कमीज वापरावा व साडी वापरत असेल तर सोबत सलवार वापरावा. तसेच शिबिरास येताना उपासपोटी यावे. सोबत पाण्याची बॉटल व चपला साठी कापडी बॅग वापरावी. शिबिरास मोठ्या संख्येने (योग शिबिरार्थ्यानी) उपस्थित राहावे असे  आवाहन  पतंजली योग परिवाराचे दिपक भातलवंडे, विश्वंभर वाडेवाले, मोहन पवार, डॉ. सविता घंटे आदींनी केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी