सिडको मातृसेवा आरोग्य केंद्र येथे दोन वेळात रूगनांची तपासणी होणार -NNL


नविन नांदेड।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे १९ मे पासून  सकाळ व दुपार या दोन सत्रात तपासणीला सुरूवात झाली असून परिसरातील रूगनांनी नोंद घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.हमीद यांनी केले आहे.

 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सिडको येथे मातृ सेवा आरोग्य केंद्र असुन या केंद्रात दैनंदिन विविध आजारांवर तपासणी मोठ्या प्रमाणात केली जाते, पंरतु या रूग्णालयात असलेली कर्मचारी व डॉक्टर कमतरता व येथील स्टाफ नांदेड येथे  स्थालांतर केल्याने प्रसुती, एक्स रे ,आपरेशन यासह अनेक सुविधा उपलब्ध नसल्याने रूगनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत गेली, त्यातला त्यात बाह्य रुग्ण तपासणी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने  व वेळ अभावी अनेक रूगंनाची तपासणी होत नव्हती.

अखेर सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे नव्याने आलेले डॉ.रईसोधदीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ मातृसेवा रूगनालयास भेट देऊन पाहणी व तपासणी वेळ बाबत माहिती घेतली यावेळी फक्त एकच वेळ बाह्य रुग्ण तपासणी चालू असल्याचे निदर्शनास आल्या नंतर तात्काळ मनपाचे आरोग्य विभाग उपायुक्त व आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलुन तात्काळ दोन वेळा ओपीडी चालु करण्याची मागणी केल्या नंतर  सकाळी ९ ते १ दुपारी ४.३० ते ६ या वेळा मध्ये तपासणी होणार आहे , दूपार  सत्रात तपासणी  चालू झाल्याने ह रूग्नांची होणारी गैरसोय टळली आहे. उपायुक्त प्रशासन यांच्या वतीने सदरील आदेश काढण्यात आले असून तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी