आगामी जि.प.पं.स च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार प्रदीप नाईक व त्यांचे चिरंजीव कपिल नाईक यांनी इस्लापुर जि.प. गटासह तालुक्यातील गाव वाडी-तांड्यात संपर्क दौरे जोमाने सुरू केले आहे.
शिवणी,प्रकाश कार्लेवाड। मागील अनेक महिन्यापासून राजकीय मंडळींच्या चर्चेतला असलेला विषय म्हणजे राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक या संबधी दरम्यानच्या काळात मागील दोन ते अडीच वर्षांपासून कोरोना महामारीने डोके वर काढल्याने होते. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण विना निवडणूका होऊ नये असे सरकार व विरोधी पक्षाचे म्हणणे होते.या मुळे बहुतांशी निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या.
आता कोरोना महामारीची थोडीशी उसंत मिळाली व ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक थांबवता येणार नाही असे म्हणत काल झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात जिथे पाऊस कमी असतो तिथे निवडणूक आयोगाने वेळेत निवडणुका घ्यावे असे राज्य सरकार ला फटकारल्याने आता मराठवाडयातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूकीचे तारीख लवकरच जाहीर करण्याचे संकेत आहे.या अनुषंगाने सप्टेंबर अखेर पर्यंत जि.प. निवडणूक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषण करणाऱ्याकडून बोलले जात असून आगामी जि.प.निवडणुक डोळ्यासमोर ठेवून किनवट तालुक्यातील इस्लापुर,व जलधारा जिल्हा परिषद गटात अनेक राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागल्याने दिसून येत आहे.
या दरम्यान निवडणूक येत्या अंदाजे दोन महिन्यांच्या मागे-पुढे बिगुल वाजणार असल्याची शक्यता उराशी बाळगून किनवट तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असे दिसून येते.त्या अनुषंगाने विविध पक्षाच्या पक्ष श्रेष्टी कडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.तर विविध पक्षातील अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी गुडग्याला बाशिंग बांधून तयार होऊन बसले आहेत.तर किनवट तालुक्यातील इस्लापुर जि.प.गटातिल इच्छुक उमेदवार वाढदिवस,लग्न समारंभ,टिळा,शाल अंगठी,अंत्यविधी, जयंती,सह अन्य सामाजिक धार्मिक कार्यक्रमात मुद्दाम हजेरी लावून मतदारांशी जवळीकता,आत्मीयता व सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यासाठी कोणत्याही कार्यक्रमात इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे.
किनवट/माहूर तालुक्यात मागील तीन वेळा विजय प्राप्त करून सतत पंधरा वर्षे येथिल जनतेच्या दिलावर आदिराज्य गाजवणारे माजी आमदार प्रदीप नाईक मागील विधानसभेच्या निवडणुकीत थोडक्यात सत्ता हातातून निसटल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी कोरोना काळात तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते यांच्या सोबत फोन वरून सतत संपर्कात होते.आता कोरोना संपुष्टात येताच स्वतः माजी आमदार प्रदीप नाईक व त्यांचे चिरंजीव कपिल नाईक हे मागील काही महिन्यांपासून इस्लापुर जिल्हा परिषद गटात विविध समारंभ व कार्यक्रमात वेळोवेळी हजेरी लावताना दिसून येत आहे.
सतत होत असलेल्या दौऱ्याकडे पाहता जि.प.गटातिल राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्ह नवचैतन्य व उत्साह निर्माण झाल्यासारखे चित्र दिसून येत आहे.याचे कारण की,माजी आमदार प्रदीप नाईक व चिरंजीव युवा नेते कपिल नाईक हे इस्लापुर जिल्हा परिषद गटात विविध वाडी-तांड्यात दौरे करत भेट देत असतांना वाडी-तांड्यातील नवतरुणां कडून फोटो शूट,ग्रुप फोटो व सेल्फी काढून सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. दुसरीकडे आगामी जि.प.निवडणुकीत माजी आमदार प्रदीप नाईकांचे चिरंजीव इस्लापुर जि.प.गटात निवडणुकीच्या रिंगनात उतरवतील असे दिसून येत असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे. युवा नेते इस्लापुर जि.प.गटात कपिल नाईक यांनी निवडणूक लढवावी असे मत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या चाहत्यांकडून होत आहे.
आता आरक्षण सोडत व निवडणुकीची दिनांक ऐकण्याकडे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचे उत्साह शिगेला पोहचलेला असून सर्वांचे लक्ष्य आगामी निवडणुका कडे लागले आहे. तर पुढील काळात इस्लापुर गटात जि.प.निवडणुकीत राष्ट्रवादी,भाजपा,मकपा असे तिरंगी लढतीची निवडणूक पहावयास मिळेल तर सध्या परिस्थितीत कांग्रेस पक्ष शिवसेना,वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्षामध्ये निरव शांतता असल्या सारखे दिसून येत आहे.असे मत राजकीय विश्लेशकां कडून बोलले जात आहे.