लोह्यात विद्युत पोल बसविणाऱ्या मजुराचा शॉक लागून मृत्यू -NNL


लोहा।
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ चे काम प्रगतीपथावर आहे. त्या रस्त्यालगत लाईटचे पोल बदलण्याचे काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज लोहा शहरात असलेल्या वळण रस्त्यावर विद्युत पोल बदलण्याचे काम सुरू आहे. या कामावर काम करताना विजेचा जबर शॉक लागल्याने भंडारा जिल्ह्यातील एका 22 वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना दि. १८ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.  

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे.  महामार्गावरील पूर्वीचे रस्त्यालगतचे विद्युत पोल हटवून ते बाजूला उभे करण्याचे काम देखील सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोहा शहरालगत वळण रस्त्याचे काम सुरू आहे. वळण रस्त्यालगत असलेले जुने विद्युत पोल काढून बाजूला नवीन पोल उभे करण्याचे काम सुरू असून, सदरील कामावर राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर कार्यरत आहेत. 

भंडारा जिल्ह्यातील आमगाव बूथ ता. साकोळी येथील तबरेज शेख माजीद अगवान (वय २२) हा मागील चार महिनंपासून सदर कामावर होता. दैनंदिन प्रमाणे तबरेज शेख हा सकाळी ९ वाजता लोहा शहरालगत दोन किमी अंतरावर असलेल्या बेरळी फाट्याच्या वळण रस्त्याच्या वीज पोल बदली कामावर हजर झाला. दुपारी एक वाजता अचानक तेथील सर्व्हिस वायर मधून वीज प्रवाहित होवून तबरेजच्या उजव्या हाताला विजेचा जबर शॉक लागून तो बेशुद्ध झाला. 

सदरील बाब कामावरील इतर कामगार व गुत्तेदराच्या लक्षात आली त्यांनी तबरेज यास उपचारार्थ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तबरेज यास दुपारी पावणे दोन वाजताचे सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी गुत्तेदार ओमकार शरद नरोटे यांनी दिलेल्या माहितीवरून लोहा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ ए. एम. केंद्र हे करत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी