उमरी/नांदेड। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांना सर्वोच्च रोटरी पुरस्कार जाहीर झाला असून सदरील पुरस्कारांचे वितरण 21 मे रोजी लातूर येथे होणार आहे.या संदर्भात रोटरी गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे कळविले आहे.
रोटरी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे. ती वैश्विक शांतता सलोखा उन्नती सामाजिक व आरोग्य या क्षेत्रांमध्ये कार्य करते रोटरी समाजात कार्यरत असलेल्या गुणी होतकरू सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच प्रोत्साहित करते.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा माध्यमातून भव्य समाज भवन वासवी माता मंदिर उभारणी व अनेक गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणारे व साधू महाराज संस्थान यांच्या माध्यमातून तत्परतेने समाजसेवा करणारे महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांना यंदाचा सर्वोच्च रोटरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ते यशस्वी उद्योजक असून महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या वतीने रोटरी पुरस्काराने सन्मानित होत आहेत.
दिनांक 21 मे रोजी सकाळी अकरा वाजता लातूर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांना सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.असेही रोटरी गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. अशी माहिती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार व राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांनी दिली आहे.