लोहा| शहरा लगतच्या सुनेगाव तलावातून गाळ उपसा सुरू आहे.लोक सहभागातून हा उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी आता पर्यन्त पंधरा हजार ब्रास गाळ शेतकऱ्यांनी काढला असून शेतात टाकला. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातून गाळ उपसा तेही लोक सहभागातून केला जात आहे .कंधार उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शना खाली लोकसहभागातून गाळ उपसा मोहीम राबविले जात आहे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सूनगाव तलावातून गाळ उपसासाठी जनजागृती केली. त्याचा परिमाण मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे आहे जवळपास पंधरा हजार ब्रास माती शेतात शेतकऱ्यांनी टाकली. आता लवकरच जेसीबी ची व्यवस्था स्वतः तहसीलदार मुंडे करणार आहेत. त्यामुळे हा खर्च बचत होण्यास मदत होणार आहे
सुनेगाव सज्जचे तलाठी सी के जाधव यांनी गाळ उपसा साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. तहसीलदार मुंडे यांनी सुनेगाव तलावास भेट दिली यावेळी मंडळ अधिकारी सौ नाशिककर मॅडम, लोहा तलाठी मारुती कदम याची उपस्थिती होती.