नादेड जिल्ह्याचे पालकमंञी निवडणूक पुरतेच का ? संतप्त नागरिकांचा सवाल..-NNL

हदगाव शहराचा मुख्यप्रवेश रोड बी.अँन्ड सी...चा की नगरपरिषदेचा  


हदगाव, शे चांदपाशा
हदगाव शहरातील तामसा टी पाईट ते डाँ मनाठकर यांच्या दवाखान्या पर्यतचा मुख्यप्रवेश रोड आहे... तरी कुणाचा असा... प्रश्न शहरवासीयांना पडला असुन, याबाबतीत राज्याचे बांधकाम तथा नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आशोकराव चव्हाणच अनेक वर्षापासुन शहरवासीयांना भेडसवणारा हा जटील प्रश्न सोडवु शकतात अस नागरिकाचे म्हणने आहे. कारण स्थानिक नगसेवकाना व जबाबदार राजकीय नेत्यांना यामध्ये काहीच रस दिसुन येत नाही. कारण शहरात मुख्यप्रवेश रोड एकच असुन, या बाजुचा सरकारी रस्ता अनेक धानड्य व्यक्तीनी गिळला आहे. यामुळे हा मुख्यप्रवेश रोड दिवसेंदिवस आपघातास आमंत्रण देत आहे इतकेच नव्हे तर या मुख्यप्रवेश रोडवर काही महाभागानी न.पा.प्रशासनाला हाताशी धरुन चक्क जवळपास एक कोटी रु. नाली बाधकाम करुन आपले अवैध अतिक्रमण शाबुत ठेवले आहे 

सध्या शहरात या मुख्यप्रवेश रोडवर दिवसेदिवस वाहतुक वाढत असुन जड व इतर वाहने रोडवरच उभी करत असल्याने नागरिकांना वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे या मुळे वारंवार वाहनधारकांत वाद व वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे या बाबतीत पोलिस स्टेशनला ऐखाद्या ञस्त वाहनधारकाने संपर्क साधला तर नेहमी प्रमाणे हदगाव पोलिस स्टेशन कडुन हो म्हणुन उत्तर येते प्रत्यक्षात कोणता पोलीस येत नाही या बाबतीत  कारवाई होतांना दिसुन येत नाही केवळ वरिष्ठाना दाखविण्याकरिता थातुरमातुर कारवाई करतांना दिसुन येत आहे यामुळे शहरवासी प्रशासनाच्या अश्या कार्यशैली मुळे आता ञस्त नागरिकानी तक्रारी करणेच सोडुन दिले आहे ही वस्तुस्थिती आहे.

हा रोड कुणाचा... हदगाव शहरातील तामसा टी पाईट ते डाँ मनाठकर याच्या दवखान्या पर्यत हा रोड सार्वजनिक बाधकाम विभागाचा आहे की नगरपरिषदेचा हा वाद गेल्या अनेक वर्षापासुन आहे जर या बाबतीत प्रस्तुत प्रतिनिधीने न.पा.चे प्रभारी मुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी सरळ स्पष्ट शब्दात सागितले की तो रोड हदगाव न.पा च्या ताब्यात नाही असे त्यांनी सागितले तरी या वादग्रस्त रोडवर न.पा.चा करोडो रु निधी कोणत्या अधारे खर्च करण्यात आले आणखी विशेष म्हणजे रोडच्या व्यतिरिक्त घर बाधणी इतर कामा करिता डोळे मिटवुन सर्रास "ना हरकत परवानग्या या परिसरात  कोणत्या अधारावर देण्यात येत आहे हे सर्व उघड गुपीत जबाबदार नेते यांना माहीत असुन ही गप्प आहेत आहे या संदर्भात जेव्हा सार्वजनिक बाधकाम उपविभागाच्या कार्यकारी आभियंताशी संपर्क साधला असता त्यांनी अस सागितले की मग आमच्या ताब्यात रोड आहे तर कोट्यवधी रु निधी न.पा. प्रशासन का खर्च करते या दोन प्रशासनाच्या लुटपुटच्या लढाईत सर्वसामन्य नागरिक भरडला जात आहे ही वस्तुस्थिती आहे . 

जिल्ह्याचे पालकमंञी निवडणूक पुरतेच काय... हदगाव शहराची नगरपरिषद दहा वर्षापुर्वी शिवसेनाच्या ताब्यात होती जेव्हा प्रत्यक्षात  जिल्ह्याचे पालमंञी आशोक चव्हाण यांनी एट्री केली. त्यानी केलेल्या अहवानानुसार त्यांच्या अहवानाला सम्मान देत इथल्या नागरिकांनी हदगाव नगरपालिका मोठ्या अपेक्षेने काँग्रेसच्या ताब्यात दिली. पण नागरिकांचा माञ आपेक्षा भंग झाल्याचे दिसुन येते कारण काँग्रेसच्या जबाबदार नगरसेवकांनी नागरी समस्याकडे साफ दुर्लक्ष करित भलत्याच मलाईदार कामाकडे लक्ष देवुन शहरात होणा-या बोगस कामाकडे साफ दुर्लक्ष केले ही वस्तुस्थिती आहे.

आपल्या नेत्याकडे राजकीय हट्ट धारुन आपल्या मर्जीतील तहसिल कार्यालयचे नायब तहसिदार यांना प्रभारी म्हणून न.पा.चे मुख्याधिकारी आणले हे आवर्जून उल्लेख करावा लागेल ज्या अपेक्षेने पालकमंञी आशोक चव्हाण यांच्या गेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  शहरातील नागरिकांनी त्यांच्या अहवानला सम्मान दिला होता.  पालकमंञ्यानी ही मोठ्या विश्वासाने काँग्रेसच्या ताब्यात दिली पण नागरिकांचा अपेक्षाभंग झाला हे शहराच्या नागरी समस्या पाहतांना दिसुन येते आहे. राज्याचे बाधकाम तथा पालकमंञी निवडणूक पुरतेच का..? असा संतप्त सवाल शहरातील नागरिक करित आहे .


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी