नवीन नांदेड। सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह भ प चैतन्य महाराज गंगाखेडकर यांची दिनांक २१ मे शनिवारपासून ते दिनांक २७ मे २०२२ दरम्यान सात दिवस नांदेड हडको आनंद सागर सोसायटीतील बालाजी मंदिरात श्रीमद् भागवत कथा सायंकाळी ४.३० ते ८.०० या वेळात आयोजित करण्यात आली आहे. कथा श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कथेचे संयोजक तम्मेवार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
चैतन्य महाराज गंगाखेडकर यांनी आपल्या कथेतून आणि कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात त्यांची कथा किर्तने झाली असून समाजसेवा डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत आहेत.