हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ५ ते ७ या काळात शिबीर
हिमायतनगर, अनिल मादसवार| कोरोनमुक्तीचा उपाय.. योग हाच पर्याय हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमेटी आणि पतंजली योग समिती वाढोणाच्या वतीने उदय दि.२१ में पासून ते २८ में पर्यंतच्या काळात आठ दिवसीय मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी आपले जीवन रोगमुक्त, व्याधीमुक्त, नाशामुक्त करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मन व सुदृढ शरीरासाठी मानसिक ताणतणाव मुक्तीसाठी योग प्राणायामाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य व्याधिग्रस्त झाला आहे. यामध्ये पोटातील गैस, ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी, अल्सर, पेष्टिक अल्सर (आतड्याच्या जखमा, अशुद्धी), मूळव्याध, भगंदर, आमवात, संधिवात (कंबरदुखी, गुडघेदुखी,खांदेदुखी,मानदुखी,टाचदुखी), पोटाचे आजार (जळजळ-मळमळ-पित्त वाढणे, अन्न अपचन), मासिक पाळीचे आजार, पाणी पिण्याची पद्धत चुकीने केल्याने १०३ रोग (आजार म्हणजे कर्करोग, कैन्सर, सुद्धा होतो) इतर असंख्य आजार होतात.मोटपा (वजन/चरबी वाढणे/सुटलेले पॉट/वाढलेले कोलेस्ट्रॉल) मानसिक आजार, अशांती, राग, चिंता, चिडचिडेपणा, मिरगी, स्किझोफेनिया, मायग्रेन पेन, डोके दुखी, स्मरणशक्ती कमी होणे, केसांचे व त्वचेचे आजार (अकाली केस गाळाने, पांढरे होणे,रुक्ष होणे, टक्कल पडणे, पिंपल्स, वांग, सुरकुत्या कमी करणे) मधुमेह (शुगर), रक्तदाब ब्लडप्रेशर, अश्या सर्व आजारांना नष्ट करण्यासाठी सर्वानी योग करणे गरजेचे आहे.
हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ५ ते ७ या काळात होणाऱ्या शिबिरात योग प्राणायाम, ज्ञान धारणा, घरगुती उपचार पद्धती, दिव्या फार्मसी औषधी/पतंजली आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीने आजार दूर करता येतील. तसेच ह्या योग विज्ञान शिबिरात ८ प्रकारचे प्राणायाम, ५२ प्रकारची सुखसम व साधारण आसने, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, तरुण तरुणींसाठी दंड आसन/ बैठक, कठीण आन हे निशुल्क/मोफत शिकविल्या जातील. या शिबिरात पतंजली योग समितीचे प्रांत प्रभारी- दिनेश राठोड, जिल्हा प्रभारी सुरेश लांगडापुरे, युवा भारतचे जिल्हा प्रभारी - हांनुमंत ढगे, किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी सीतारामजी सोनटक्के, भारतीय स्वाभिमानी ट्रस्ट महाराष्ट्राचे प्रांत कोषांध्यक्ष प्रदीपजी काटेकर, भारतीय स्वाभिमानी ट्रस्ट महाराष्ट्राचे प्रांत सहप्रभारी अनिलजी अमृतवार, भारतीय स्वाभिमानी ट्रस्ट नांदेडचे जिल्हा प्रभारी रामजी शिवपनोर, जिल्हा कोषाध्यक्ष महारुद्राजी माळगे, पतंजली योग समितीचे जिल्हा सहप्रभारी अशोकजी पवार हे मुख्य योग प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच शिबिरानंतर सकाळी रिकामे पोटी नाडी परीक्षण केले जाईल, त्यानंतर सशुल्क/अल्पदरात सर्व चिकित्सा डॉ वैद्य पूजा देऊळकर यांच्या माध्यमातून विविध आजारावर पंचकर्म, षटकर्म, आणि आरोग्यपीठ दिल्लीचे कैलासजी कदम यांच्याकडून निसर्गोपचार न्युरोथेरिपी उपचार केले जातील. तसेच पतंजली योगपीठ हरिद्वार हुन प्रशिक्षित वर्षाताई केंद्रे, शिवराज होळपे, रामजी यांच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधी उपचार दर्राओज रात्री ८ ते ९ काळात आरोग्य सभेतून केले जातील. तसेच आहार, विहार, जडीबुटी, संघटन सूत्र, अष्टांग योग, घरगुती उपचार व इतर विषयावर सखोल मार्गदर्शन होईल.