नांदेड। आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम व त्यांच्या सहका-यांच्या नेतृत्वाखाली स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आता होऊ घातलेल्या सत्रांच्या व सर्व विभागांच्या परीक्षा ह्या MCQ पद्धतीने घेण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यासह विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाने परिक्षा या ऑफलाईन तसेच Theory पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यामध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच मागील सत्र हे 60%-70% ऑनलाईन पद्धतीने शिकवले आहे व मागील दिड ते दोन वर्षात झालेल्या परीक्षा या MCQ पद्धतीने घेतल्या गेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा MCQ पद्धतीने परीक्षा होतील या हेतूने अभ्यास केला आहे. परंतू विद्यापीठाने परीक्षा या Theory पद्धतीने होतील असा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी हा मानसिकताणात आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्याना मानसिक ताणातून मुक्त करण्यासाठी परीक्षा या MCQ पद्धतीने घ्याव्या ही मागणी करत आंदोलन करुन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम,फैसल सिद्धीकी,प्रसाद पवार,सोहेल लाला,सय्यद अफ्नान,अनिकेत सोनकांबळे,निखील वैद्य,मोहम्मद शोएब,शेजल गोवंदे,मोहित खियानी तसेच यासह शेकडो विद्यार्थांची उपस्थितीत होती.