अरूण तम्मडवार यांना चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार -NNL


किनवट,माधव सूर्यवंशी।
‘अप्रतिम मीडिया’पुणे यांच्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिल्या जाणार्या चौथास्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता  पुरस्कार 2022 साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या 56 प्रतिनिधींची नावे घोषित करण्यात  आली आहेत. त्यात दैनिक पुढारीचे किनवट तालुका प्रतिनिधी अरूण तम्मडवार यांची  ‘वने व इको टूरिझम वृत्त’ गटातून उपरोक्त पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

   
चौथास्तंभ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. 2020-2021 या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन विश्लेषण व पुरस्कार निवडीचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ.अनिल फळे, संचालिका सौ.प्रीतम फळे, निमंत्रक राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर,जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली आहे. पुरस्कार विजेत्यांना मुंबई येथे लवकरच होणार्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.
      
पुरस्कार विजेत्यांची निवड ज्या गटांसाठी झाली त्यात जीवन गौरव, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर,माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त गट, वने व इको टूरिझम वृत्त,विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त, उद्योग व व्यापार वृत्त, कला-संस्कृती वृत्त गट, कृषी वृत्त, शैक्षणिक वृत्त, आरोग्य वृत्त, साहित्य संवाद गट, ग्रामीण विकास वृत्त, सहकार वृत्त, पत्रकारिता अध्यापन गट, स्थानिक विकास वृत्त, राजकीय वृत्त, सामाजिक वृत्त, शासकीय योजना वृत्त, स्थानिक स्वराज्य संस्था वृत्त, युवा क्षेत्र वृत्त, धार्मिक क्षेत्र वृत्त, आर्थिक वृत्त, गुन्हेगारी वृत्ते, प्रेस फोटाग्राफी, ग्राफिक डिझाईनिंग पत्रकारेतर गट असून, या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राज्यातील अनेक पत्रकारांनी आपली नामांकनपत्रे दाखल केली होती. त्यातील 56 पत्रकारांची नावे उपरोल्लेखित पुरस्कारांसाठी घोषित करण्यात आली आहेत. या पुरस्काराबद्दल  तम्मडवार यांचे या क्षेत्रातील सहकारी व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी