नांदेड। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA)मार्फत दरवर्षी देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या GPAT परीक्षेत विष्णुपुरी येथील सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली, नुकत्याच झालेल्या GPAT परीक्षेत महाविद्यलयातील ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यां मध्ये, १. वासू पवनकुमार (AIR-1063) २. शिंदे आकाश (AIR-१५६४) ३. मगर शारदा (AIR-१८१७) ४. कोटुरवार अश्विनी (AIR-१८१७)५. क्षीरसागर सुशील (AIR-२२५३) ६. भुसावळे संदीप (AIR-२५०६) ७. खानसोळे लक्ष्मी (AIR-२५०६)८. गंदगे पल्लवी (AIR-३९८७)९. मालू मयूर (AIR-३९८७)१०. सोनोने प्रज्योत (AIR-४३९१) ११. डावरे कृष्णा (AIR-१९९८०) यांचा समावेश आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे, प्राचार्य विश्वनाथ भरकड, डॉ. प्रकाश कटकम, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगांवकर, प्राचार्य डॉ. पुंडलिक वानखेडे, प्राचार्य डॉ. गजाला खान, प्राचार्य सुनील पांचाळ, प्राचार्य शिवानंद बारसे, प्राचार्य सुनील हंबर्डे, प्रशासकीय अधिकारी श्री.विश्वनाथ स्वामी तसेच विभाग प्रमुख डॉ.जमील अहेमद, डॉ. एस बी जाधव, प्रा. मौ. जमीरुद्दीन, डॉ. फाल्गुना डॉ. पल्लवी कांबळे, प्रा. प्रवीण कारले प्रा. सूरज शिंदे, GPAT मार्गदर्शक प्रा. प्रवीण मुळी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.