राष्ट्रीय इंडियाका स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना -NNL


नांदेड।
भारतात नुकताच रूजू झालेल्या इंडियाका या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा उत्तरप्रदेशमध्ये आयोकजीत करण्यात आली असून यात सहभागी होण्यासाी महाराष्ट्र संघ नांदेड येथून रवाना झाला आहे. सदरील संघटनेचे राज्य अध्यक्ष रूपेश पाडमुख व इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील संघाला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पहिल्या राष्ट्रीय इंडीयाका या खेळाची स्पर्धा उत्तरप्रदेशमधील गाझीयाबाद येथे दि.27 ते 29 मे 2022 या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राची टिम नांदेड येथून रवाना झाली. यात मुंबई, ठाणे, लातूर, नांदेड, जालनासह विविध जिल्ह्यातून खेळाडूंचा समावेश आहे.

या सर्व टिमसोबत सुहास कांबळे, अभिजीत खेडकर, शैलेश कुकडे, शुभम पाडदे, ईश्वर नांदेडकरसह इतर प्रशिक्षक सोबत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणार्‍या खेळाडूच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देण्यासाठी इंडीयाका या खेळाचे महाराष्ट्र अध्यक्ष रूपेश पाडमुख, राज्य उपाध्यक्ष प्रवीणकुमार कुपटीकर, पत्रकार बजरंग शुक्ला, शेख चांद, राज्य सचिव रविकुमार बकवाड, शिवानंद मठपती यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी