मालेगाव/ नांदेड| स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक असलेल्या सुदाम चौरे यांना जिल्हा परिषद मालेगाव सर्कलमधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक करत आहेत.
गेली तीस वर्ष बाळासाहेब देव आणि धर्म मानून ज्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बाळासाहेबांचा आदेश म्हणून अनेक आंदोलने केली मालेगाव सर्कल मध्ये शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम केले असे ज्येष्ठ शिवसैनिक सुदामराव चौरे यांना जिल्हा परिषद मालेगाव सर्कलचे उमेदवारी देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी कट्टर शिवसैनिक संतोष कदम सह असंख्य शिवसैनिकांनी केली आहे.
जिल्हा परिषद सर्कल मध्ये जर भगवा फडकवायचा असेल तर सुदाम चौरे यांना उमेदवारी देऊन पक्षाने आपला झेंड फडकवावा तसेच ज्यांनी कधी शिवसेनेचं निष्ठावंत म्हणून काम केले नाही अशा उपर्यांना पक्षाने संधी देऊ नये अशी मागणी यावेळी अनेक शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.