नविन नांदेड| शिवभक्त सेवा मंडळ व समाज बांधव सिडको यांच्या वतीने ६ ते १३ एप्रिल रोजी अखंड शिवनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून किर्तन व प्रवचन यासह दैनंदिन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले असून १३ एप्रिल रोजी शिव पार्वती विवाह सोहळा महाराज श्री पिंटू महाराज मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या यांच्या पुरोहित खाली व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज व श्री शिव लिंगेश्वर भगवान यांच्या कृपा आशिर्वादाने आमच्या येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह बुधवार दि. ६ एप्रिल २२ ते बुधवार दि. १३ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाला गुरुवर्यांचे अमृतोपदेश लाभणार आहेत. या शिवनाम सप्ताहात खालील गुरुवर्यांचे अमृतोपदेश होईल.
श्री गुरु १०८ ष.ब्र. डॉ. नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, लासीन मठ, पुर्णा (ज.) श्री गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज, वीरमठ, अहमदपुर आचार्य गुरुराज स्वामी, भक्तीस्थळ अहमदपुर सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ सकाळी ६ ते अन्नदात्यांकडून शिवरुद्राभिषेक ८ ते ११ परमरहस्य याचे सामुदायीक पारायण ११ ते १२ प्रवचन, दुपारी ३५ मन्मय गाथा भजन रात्री ९ ते ११ किर्तन शिवजागर व शि.भ.प.सौ.कावेरी ताई मुदखेडे, संगमेश्वर बिरादार,धनराज बुलबुले, मन्मथ अप्पा डांगे,लक्षमण विभुते, सौ.किरती ताई स्वामी ,शिवशरण ,श्रीराम देशमुख, मोहनराव कावडे यांच्या किर्तन तर शि.भ.प.सौ.सुरेखाताई किडे ,सौ.संगिता कराहळेकर,राम भुरे पेटंर, सौ.सतयभामा यैजगे,प्रा. डॉ.शशीकांत दुर्ग, प्राचार्य, धाराशिव शिराळे, त्रिनेत्र स्वामी, परमेश्वर कार्लकर, यांच्ये प्रवचन १३ एप्रिल रोजी शिव पार्वती विवाह सोहळा व गुरुवर्य यांच्ये अशिरवचन, व दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला प्राध्यापक मनोहर धोंडे यांची उपस्थिती राहणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन शिवभक्त सेवा मंडळ व अखंड शिवनाम सप्ताह संयोजन समिती सिडको नविन नांदेड चा वतीने करण्यात आले आहे.